| महानगरपालिका नागपूर शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेले उपक्रम | |||
| 1) पायलट शाळा उपक्रम | |||
| नागपूर महानगरपालिका अंतर्गत 129 प्राथमिक/उच्च प्राथ. व 29 माध्यमिक शाळा संचालित असून मा. सौ.नंदाताई जिचकार महापौर मनपानागपूर, मा. श्री. दिलीपजी दिवे, सभापती, शिक्षण समिती, मा. श्री. नागेशजी सहारे, क्रीडा सभापती, मा. आयुक्त, श्री. अभिजीत बांगर मा. अप्पर आयुक्त, श्री. राम जोशी, मा. उपायुक्त, श्री. राजेश मोहिते यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली व दिलेल्या दिशानिर्देशानुसार तसेच सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांच्या सक्रीय सहभागाने व सहकार्याने शिक्षण विभाग प्रगती पथावर वाटचाल करण्यास कटीबद्ध आहे. मनपा शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये वाढ व पटसंख्या वाढीच्या दृष्टिने प्रत्येक झोनमधील निवडक शाळांना पायलट शाळा अंतर्गत निवडून या शाळांच्या गुणात्मक, दर्जात्मक व संख्यात्मक वाढीवर लक्ष केंद्रित करण्याकरिता पायलट शाळा योजना शैक्षणिक सत्र 2018-19 पासून सुरू करण्यात आली. या योेजनेे अंतर्गत पालक सभा माजी विद्यार्थी मेळावा, वनामती येथे सहा. शिक्षणाधिकारी, शाळानिरीक्षक, मुख्याध्यापक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शिक्षक व विद्याथ्र्यांमध्ये शिस्त निर्माण करणे, शाळा परिसर स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य विषयक बाबी, नियमित पालक सभा, लोकसहभाग, नाविन्यपूर्ण बाबींचा सहभाग इ. बाबींवर भर देण्यात येऊन समृद्ध शाळा निर्माण करण्याचे दृष्टिने शिक्षण विभागाची वाटचाल सुरू आहे. | |||
| 2) कलादालन | |||
| महानगरपालिकेतील आर्थिकदृष्टया कमकुवत विद्याथ्र्यांना स्वतःमधील कलागुणांचा विकास करण्यासाठी आर्थिक परिस्थितीमुळे सधी उपलब्ध होत नाही. तेव्हा मनपातील विद्याथ्र्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सदर येथील रा.ब.गो.गो. हिंदी माध्यमिक शाळेत कलादालनाची निर्मिती करण्यात आली. या कलादालनात चित्रकला, संगीत, कार्यानुभव, नृत्य इ. कक्ष तयार करण्यात आले. शाळेेपासून 3 ते 4 किमी. अंतरावरील मनपाच्या विविध शाळांमधील विद्याथ्र्यांना या कलादालनात ने-आण करण्यासाठी मनपाच्या परिवहन विभागातर्फे मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मनपातील शिक्षकांतर्फे येथे विद्याथ्र्यांना विविध कलांबाबत मार्गदर्शन करण्यात येेते. कलादालनातील विद्याथ्र्यांनी लोकसंख्या शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा इ. विविध विषयांवर आधारित निबंध, चित्रकला, नृत्य, नाटय गायन, पथनाटय इत्यादी क्षेत्रात जिल्हास्तर, राज्यस्तरावर विजयी होऊन आपल्या क्षमतेची चुणूक दाखविलेली आहे. | |||
| 3) किल्ले स्पर्धा | |||
| शिवकालीन किल्ले स्पर्धामध्ये शाळांनी सहभाग घेतला व जिल्हास्तरीय स्पर्धेत वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. | |||
| 4) अपूर्व विज्ञान मेळावा | |||
| नागपूर मनपा शिक्षण विभाग व असोसिएशन फाॅर रिसर्च अँड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याथ्र्यांमध्ये वैैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती व्हावी तसेच परिसरात उपलब्ध साहित्यातून तयार होणाÚया उपकरणांच्या सहाय्याने सोप्या सोेप्या प्रयोगातून विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या या उद्देशाने राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या प्रांगणात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात मनपाच्या विविध शाळांमधील विद्याथ्र्यांनी सोप्या सोप्या प्रयोगातून भेट देणाÚया विद्याथ्र्यांना विज्ञान विषयातील कठीण संकल्पना सोप्या करून वैज्ञानिक दृष्टिकोनाची रूजवणूक केली. | |||
| 5) महापौर चषक वंदेमात्रम गीतगायन स्पर्धा | |||
| नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे 9 ऑगस्ट क्रांतीदिना निमित्त्य सन 1996 पासून माजी महापौर कुंदाताई विजयकर यांच्या कार्यकाळापासून सुरू करण्यात आलेल्या महापौर चषक आंतरशालेय वंदेमात्रम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नागपूर शहरातील सी.बी.एस.सी., अनुदानित, विनाअनुदानित तसेच मनपा शाळांनी सहभाग घेतला. | |||
| 6) आंतरराष्ट्रीय योग दिन | |||
| 21 जून आंतरराष्ट्रिय योग दिना निमित्त्य यशवंत स्टेडियम येथे योगदिनाचे आयोजन करण्यात आले. या निमित्त्य विविध संस्थांद्वारा योगाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये मनपातील सर्व पदाधिकारी, अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. | |||
| 7) शिक्षण सप्ताह | |||
| विद्याथ्र्यांच्या विविध कलागुणांच्या विकासासाठी केंद्रस्तरीय व झोनस्तरीय शिक्षण सप्ताहात क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम झोन स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक झोनमधील, झोन स्तरावरील विजयी तीन चमूंसाठी केंद्रिय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. | |||
| 8) बेटी बचाओ, बेटी पढाओ | |||
| बेटी बचाओ, बेटी पढाओ अंतर्गत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी रोजी मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुलींच्या नेतृत्व विकासास व शिक्षणास चालना मिळावी. या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्थामार्फत शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य, आहार, शारीरिक बदल, मासिक पाळी याबाबत मार्गदर्शन, समुपदेशन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त्य महिला व बालकल्याण समिती मनपा नागपूर तर्फे सुरेश भट्ट सभागृहात आयोजित ‘पोरी जरा जपून’ कार्यक्रमात मनपाच्या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. किशोरवयीन विद्याथ्र्यांनींना रोटरी क्लब तसेच सियानतर्फे मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. (वर्षभराचा स्टाॅक) | |||
| 9) गुणवंत विद्यार्थी सत्कार | |||
| महानगरपालिकेेच्या तीनही माध्ययमातून इयत्ता 10 वी च्या व तीनही शाखांमधील इयत्ता 12 वी च्या प्रथम क्रमांकात आलेल्या विद्याथ्र्यांना महापौर फंडातून 2 ग्रॅमचे सुवर्ण नाणे तसेच 10 वी 12 वी च्या प्रथम 3 क्रमांकात येणाऱ्या तसेच मागासवर्गातून प्रथम व अपंगातून प्रथम येणाऱ्या विद्याथ्र्याला रोख पारितोषिक देण्यात आले. | |||
| 10) पर्यावरण संरक्षण | |||
| मनपा शिक्षण विभाग व ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून 2018 रोजी विश्व पर्यावरण दिनानिमित्त्य स्व. राजे रघुुजी सभागृह, टाऊन हाॅल येथे प्लास्टिक मुक्तीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच गणेश विसर्जना दरम्यान निर्माल्य संकलन उपक्रमात विद्याथ्र्यांनी सक्रीय सहभाग घेतला. तसेच डाॅ. राममनोहर लोहिया माध्य. शाळेत तंबाखू मुक्ती अभियान राबविण्यात आले. | |||
| महानगरपालिका नागपूर शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आलेले आणखी उपक्रमे बघण्याकरिता |