नागपूर महानगरपालिका प्रषासकीय संरचना
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी मधून महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यात येत असून महापौर महापालिकेचे विचार विनिमयात्मक प्रमुख आहेत. महापौर विविध सल्लागार समित्या जसे स्थायी समिती, सार्वजनिक आरोग्य बाजार, शिक्षण, जलप्रदाय, लोककर्म, महिला व बालकल्याण समिती इत्यादींचे सहकार्याने नागरिकांना विविध लोकोपयोगी सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही पार पाडतात.
महानगरपालिका प्रशासनाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी निगम आयुक्त असून, अति.निगम आयुक्त, उप निगम आयुक्त, अधिक्षक अभियंता, स्वास्थ अधिकारी, नगर अभियंता, विकास अभियंता, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय), (स्लम), (प्रकल्प), (बांधकाम), (विद्युत) उप संचालक, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी शिक्षणाधिकारी, करनिर्धारक व संग्राहक, चुंगी, उद्यान, वाचनालय, अधिक्षक, प्रमुख अग्निशमन अधिकारी, जनसंपर्क इ. खाते प्रमुख वार्ड अधिकारी/ सहा.आयुक्त यांचे सहाय्याने महसूल गोळा करणे व व्यवस्थापन करून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य. प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून निगम आयुक्त कार्य करतात.
नागपूर महानगरपालिकेचे एकूण 10 झोनल कार्यालय आहेत. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपूरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी.